ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिम्मित नाटळ- सांगवे विभागात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिवसभर नाटळ- सांगवे विभागात संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नाटळ जि प मतदार संघातील सर्व हायस्कूल व शाळांमध्ये वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी सोबत विभागिय अध्यक्ष विजय भोगटे, सरपंच श्री संजय सावंत,मंगेश बोभाटे,मयुरी मुंज, राजेश सापळे, प्रदीप सावंत, राजू सापळे, लक्ष्मण ठाकुर आणि भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.