शिडवणे नं. १ शाळेत जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

आज दि. 21जून रोजी शिडवणे नं. १ शाळेत जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. ओमकार मंत्र आणि योग प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर सांगुळवाडी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करत विद्यार्थ्यांकडून ती करून घेतली. यामध्ये ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, पद्मासन, वज्रासन, चक्रासन, सिद्धासन, पादहस्तासन, सूर्यनमस्कार यांसारख्या आसनांचा शास्त्रशुद्ध सराव करून घेण्यात आला. मुख्याध्यापक आणि योगशिक्षक प्रवीण कुबल यांनी विद्यार्थ्यांना दीर्घ श्वसन आणि संथ श्वसनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांचा सरावही करून घेतला.
योगावर आधारित एका सुंदर गाण्याचे अभिनयासह सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमात आणखी रंगत आली. शेवटी हास्यासन आणि शवासन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी कृषी महाविद्यालयातील पृथ्वीराज नरके, निशांत माने, तेजस येडगे, दिग्विजय जांभळकर, दिग्विजय संकपाळ, अभंग सलगर, राहुल पळसकर, वेंकटेश्वर रेड्डी, ऋतेश यादव आणि अश्रफ उस्मान या योग सहायकांनी विद्यार्थ्यांना योगाचे उत्तम मार्गदर्शन केले. त्यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व तसेच त्याचे आरोग्यविषयक फायदे समजावून सांगण्यास मदत झाली.

error: Content is protected !!