सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा होणार पंढरपूर येथे घरचा सत्कार

शनिवार 21 जून रोजी सपत्नीक सन्मान सोहळ्याचे आयोजन
गौरव सोहळा समितीच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली
मधून कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले अजयकुमार सर्वगोड यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता शामियाना हॉटेल सभागृह स्टेशन रोड पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली च्या कार्यकारी अभियंता पदावरून सर्वगोड 31 मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. सर्वगोड यांचे मूळ गाव हे पंढरपूर आहे. आपल्या भूमीतील सुपुत्राने तळकोकण प्रांतात जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका पिटला आहे.
कणकवली विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार सांभाळताना सर्वगोड यांनी स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला. अभ्यागतानी भेटण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही अशी पाटी आपल्या केबिन च्या दरवाजावर लावून केबिनचा दरवाजा उघडा ठेवून सर्वगोड यांनी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार पारदर्शक ठेवला. पिडब्ल्यूडी च्या कणकवली विभागात 2 हजार हुन अधिक कोटींच्या विकासकामांचा त्यांनी धडाका लावला. साहित्य, कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही सर्वगोड कणकवली येथे कार्यरत असताना नेहमीच सक्रिय सहभागी झाले. सर्वगोड यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी पंढरपूर येथे नागरी समिती गठीत करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड सेवापूर्ती गौरव सोहळा समिती पंढरपूर यांच्या वतीने सर्वगोड यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार शामियाना हॉटेल सभागृह स्टेशन रोड पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. गौरव समितीचे अध्यक्ष एल एस सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या हा सत्कार सोहळा गौतम विद्यालय पंढरपूर चे माजी मुख्याध्यापक सुभाष ढवळे, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सोलापूर विभागीय अध्यक्ष विजयानंद भालशंकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ सिकंदर ढवळे, अंबादास वायदंडे, डी. एन. दोडके, गिरीष वाघमारे तसेच गौरव समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.