पालकमंत्री नितेश राणें यांच्या वाढदिवसानिम्मित शिवसेनेतर्फे खारेपाटण येथे गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन

वृक्षारोपण उपक्रमाचे देखील आयोजन

शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे केले आवाहन

महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमी च्या वतीने खारेपाटण तरळे विभागातील इयत्ता दहावी व बारावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ येत्या 21 जून रोजी सकाळी दहा वाजता शेठ न म विद्यालय येथे आयोजित केला आहे
यश अकॅडमी दरवर्षी हा उपक्रम आयोजित करते संस्थेचे हे 23 वे वर्ष असून खारेपाटण विभागातील खारेपाटण शेरपे वारगाव व तरळे हायस्कूल तसेच देवगड कोरले धालवली हायस्कूल येथील दहावीत प्रथम आलेल्या व खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मधील आर्ट्स कॉमर्स व सायन्स मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना गौरवण्यात येणार आहे तसेच दहावी बारावी नंतरच्या करिअर दिशा या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले आहे

तसेच नाम नितेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनाक 23 जून रोजी खारेपाटण रेल्वेस्टेशन रोडवर कोंड डवाडी पाण्याची टाकी पर्यंत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

तरी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना उपतालुका प्रमुख व यश संस्थेचे मंगेश गुरव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!