सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार

सामाजिक स्तरावर केलेल्या विविध उपक्रमांची घेतली दखल

 ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या,तक्रारी,प्रबोधन करत सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यास  गौरविणेत येते.

मालवण येथील डॉ राहुल वालावलकर यांच्या संस्कार सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्, जिल्हास्तरीय प्रबोधन कार्यशाळेत राज्य सचिव अरुण वाघमारे,राज्य संघटक श्री सर्जेराव जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या शुभहस्ते, जिल्हाध्यक्ष प्रा श्री सुरेश पाटील,ग्राहक आयोगाचे माजी सदस्य श्री कमलाकांत कुबल,ग्राहक पंचायत मालवण शाखा उप।ध्यक्ष श्री बागवे,डॉ राहुल वालावलकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा स्मृती चिन्ह,शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करून गौरव करण्यात आला.,यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीचे संघटक श्री विष्णुप्रसाद दळवी,सहसंघटक श्री मोहिते,सहसंघटिका सौ रीमा भोसले,सचिव श्री संदेश तुलसणकर,सहसचिव सौ सुगंधा देवरुखकर, मालवण शाखेचे संघटक श्री नितिन वाळके,सहसंघटिका सौ वफा खान,सचिव श्री मालंडकर,श्री महेश काळसेकर,श्री रत्नाकर कोलंबकर मालवण शाखेचे सर्व पदाधिकारी, कणकवली शाखेच्या अध्यक्ष। सौ श्रद्धा कदम,सचिव सौ पूजा सावंत,श्री विनायक पाताडे, सुभाष राणे,राजन भोसले,वैभववाडी शाखेचे अध्यक्ष श्री तेजस साळुंके,जिल्हा सल्लागार श्री समीर वंजारी,देवगड, कुडाळ,सावंतवाडी,दोडामार्ग शाखेचे सर्व पदाधिकारी अन साधक,जेष्ट नागरिक,महिला वर्ग अन इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते
यावेळी सत्कारमूर्ती, सिंधुदुर्ग ग्राहक पंचायत उपाध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी उपस्थिती सर्वांचे हार्दीक आभार मानून ग्राहक अन जेष्ट नागरिकांचे हक्क अन अधिकार,कथा,व्यथा अन उपाययोजना, शासन निर्णय याबाबत सर्वांना त्यांनी खुमासदार नेहमीचे शैलीत सविस्तर मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!