मत्स्य उद्योग मंत्र्यांचे खाजगी OSD अजयकुमार सर्वगोड यांना तात्काळ मंत्रालयातून हटवा!

माजी आमदार परशुराम उपरकर यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी
मत्स्य उद्योग मंत्र्यांचे खाजगी OSD म्हणून मंत्रालयात असतो वावर
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालावा म्हणून मंत्र्यांचे PS,PA व मंत्र्यांचे OSD आपल्या देखरेखेखाली नेमले जाणार आणि त्यांची व त्या असलेल्या अधिकाऱ्यांची सर्वबाबतची तपासणी करून नेमणुका नेमल्या जाणार अशा प्रकारच्या बातम्या दूरचित्रवाणी व वृत्तपत्रातून आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी अनेक वेळा अशा भ्रष्ट PS, PA, OSD यांची नेमणूक होणार नाही असे सांगितले आहे. असे असताना भ्रष्टाचाराचे आरोप झालेले व चौकशा प्रलंबित असलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे यांच्याकडे खाजगी osd म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. या बाबतची तक्रार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. या निवेदनात उपरकर यांनी म्हटले आहे, मत्स्य उद्योगमंत्री नामदार नीतेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्याकडे असणारे अजयकुमार सर्वगोड तत्कालीन कार्यकारी अभियंता कणकवली जि. सिंधुदुर्ग नुकतेच ६ महिन्यापूर्वी ३१ मार्च २०२५ रोजी निवृत झालेत. ते खासगी OSD म्हणून काम पाहतात. त्यांना मत्स्यउद्योग मंत्र्यांच्या कार्यालयात एसी केंबिन व वाहन दिलेले आहे. श्री. अजयकुमार सर्वगोड यांच्यावरती अनेक प्रकारच्या तक्रारी प्रलंबित आहेत. व त्या विरोधात न्यायालयात व लोकआयुक्तांकडे निवाडे चालू आहेत. असे असताना खासगी OSD म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मत्स्य उद्योग व पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे खासगी OSD म्हणून असणारे सर्वगोड हे आपल्यावरती होणाऱ्या चौकशीबाबत दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यांच्या चौकशा शासन स्तरावर एप्रिल २०२३ पासून प्रलंबित आहेत. त्या चौकशा ३१ मार्च २०२५ ल निवृत होउनही पूर्ण झालेल्या नाहीत. असे खासगी OSD मंत्रालयात वावरत आहे. व थेट अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हातील बांधकामचे अधिकारी यांना फोन लावून विविध कामे सांगत असून त्यांच्या काळात जी कामे झाली आहेत. त्या कामांबद्दल विविध अधिकारी व कर्मचारी यांना फोन करून पालकमंत्री यांच्या वतीने विविध सूचना करतात. तसेच जिल्हातील अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या वतीने थेट फोन लावून कामे सांगत आहेत. त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या सर्व बैठकीला जिल्हातील वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयांच्या बैठकीमध्ये पुढेपुढे करून त्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित असल्याचे वृतपत्रांमध्ये फोटोही छापून आले आहेत. त्यामुळे काही अधिकारी व कर्मचारी यांना पालकमंत्र्यांचे OSD म्हणून फोन लावून आदेश देतात. व मत्स्यउद्योग मंत्र्यांच्या कार्यालयात व मंत्रालयांमध्ये शासकीय OSD असल्याचे भासवून मंत्रालयात वावरत असतात अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिशाभूल करतात.अजयकुमार सर्वगोड हे निवृत्त होऊन अवघ्या ३ ते ४ महिन्यात पालकमंत्र्यांकडे खासगी OSD म्हणून काम करत असल्याने वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांना शासकीय OSD असल्याचे भासवून पालकमंत्र्यांच्या वतीने फोन लावून निर्देश देतात. याबाबत सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांना सदर श्री. अजयकुमार सर्वगोड हे OSD ची नेमणूक झालेली माहिती मागिलली असता OSD म्हणून नियुक्त झाले नाही अशी सामान्य विभागाकडून माहिती आलेली आहे. ते पत्र सोबत जोडत आहे. तरी या सर्वबाबीची चौकशी करून नुकतेच निवृत झालेले कार्यकारी अभियंता अजयकुमार सीताराम सर्वगोड यांना मंत्रालयातून दूर करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.