आमदार नाईक यांच्या कार्यालया शेजारी स्टॉल लावण्यावरून एकाचे डोके फोडले

कणकवलीत काल सायंकाळची घटना

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयाच्या शेजारी गटारावर स्टॉल लावण्यावरून स्टॉल धारकाचे एकाने डोके फोडले. त्या स्टॉलधारकाने या घटने नंतर कणकवली पोलिसात धाव घेतली होती. तर त्या स्टॉल च्या मागील भागात असलेल्या जमिनीच्या मुद्द्यावरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे पाडव्याच्या आदल्या दिवशी त्या स्टॉल धारकाला गंभीर जखमी व्हावे लागले.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!