दारिस्ते गावात विकास कामांचा धडाका

अनेक कामांचा माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हा नियोजन, जनासुविधा
योजनेतून दारिस्ते गावातील मंजूर कामांचा शुभारंभ माजी जि प अध्यक्ष संजना संदेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सौ सानिका गावकर,सरपंच दारिस्ते, संजय सावंत, उपसरपंच, मयुरी मुंज, माजी सरपंच सांगवे, बाबी साळसकर, गोपीनाथ सुतार,नेहा सावंत, वृषाली कदम,संजय गावकर, नंदेश सावंत, अंजली शिरसाट, लक्ष्मण घाडीगांवकर, मदन बागवे, सोपान पवार तसेच गावातील ग्रामस्थ मोठया संख्येन उपस्थित होते.संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन योजनेतून जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना (९० लाख), वरची वाडी- सुतार वाडी स्मशान भूमी दुरुस्ती (३ लाख),शाळा दारिस्ते नं १ स्वछतागृह(१ लाख) निधी मंजूर करून दिल्या बद्दल गावातील ग्रामस्थानी सौ संजना संदेश सावंत आणि श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे आभार व्यक्त केले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!