भिरवंडे गावच्या विकासाचा राणेंनी दिलेला शब्द पाळला

भिरवंडे गावच्या विकासाकरता कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांची माहिती

भिरवंडे गावच्या विकासात आतापर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे योगदान राहिले आहे. आतापर्यंत भिरवंडे गावच्या विकासासाठी दिलेला शब्द राणे कुटुंबीयांनी पाळला व तो शब्द यावेळी देखील पाळत भरघोस विकास निधी देऊन भिरवंडे वासीयांना विकासाचा आमच्या माध्यमातून दिलेला शब्द राणे कुटुंबीयांनी पूर्ण केला. यात प्रामुख्याने भिरवंडे मुख्य रस्त्याच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल 5 किलोमीटर कामाला मंजुरी मिळाली असून, बजेट मधून भिरवंडे गावातील दोन रस्त्यांना देखील तब्बल 90 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांनी दिली. तसेच भिरवंडे गांधीनगर येथील धरणाच्या कामाला देखील मंजुरी मिळाली आहे. आतापर्यंत भिरवंडे गावच्या विकासात राणे कुटुंबीयांकडून विशेष लक्ष देऊन अनेक विकास कामे मार्गी लावली गेली. यावर्षी देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्याकडून या कामांकरिता निधी मंजुरी करता विशेष लक्ष दिल्याने भिरवंडे वासियांची विकास कामांची मागणी मार्गी लागल्याबद्दल गोट्या सावंत व माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांनी आभार व्यक्त केले आहेत.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!