रामेश्वर वाचन मंदिर येथे चोखंदळ वाचनमेळावा संपन्न

माजी अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजन
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचराने माजी अध्यक्ष कै. श्रीकांत सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर वाचन मंदिर येथे’चोखंदळ वाचनमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.याकार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, अक्षरपूजन, प्रार्थना व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यानंतर सुरेश ठाकूर यांनी संस्थेस दिलेल्या देणगीदाखल पुस्तकातून त्यांनी निवडलेल्या वाचन स्नेह्यांनी सदरची पुस्तके घेऊन त्यावर
परिक्षणात्मक विवेचन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यात मंदार सांबारी, सौ. श्रद्धा सांबारी, रामचंद्र कुबल, श्रीम. सुगंधा गुरव, लक्ष्मण आचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, सुरेश गावकर, .उदय मेहेंदळे, रमाकांत शेटये या स्नेह्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून सदर पुस्तकांवर परिक्षणात्मक विवेचन केले. यानंतर कै. श्रीकांत सांबारी यांच्याबद्दल श्री. चंद्रकांत घाडी, श्री. मोहन गावकर, कोल्हापूर, सौ. माधवी स्वार, श्री. उदय मेहेंदळे यांनी आपली लिखित मनोगते पाठविली होती त्यांचेही वाचन यावेळी करण्यात आले. अत्यंत नेटका असा हा कार्यक्रम उपस्थित सर्व वाचनप्रेमींना खूपच आवडला. या कार्यक्रमबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाजी भिसळे, कार्यवाह श्री.अर्जुन बापर्डेकर, ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी, वाचक श्री. दत्तात्रय कानविंदे, सांस्कृ. समिती सदस्या सौ. श्रद्धा महाजनी यांनी श्री. सुरेश ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नातून आपले मत व्यक्त केले. तीन तास उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृ. समिती सदस्या सौ. वर्षा सांबारी यांनी केले. या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी जुवेरीया मुजावर सांस्कृतिक समितीच्या श्रद्धा महाजनी, कामिनी ढेकणे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.