जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी गावविकासाचा ध्यास ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन मुंबई समिती अध्यक्ष दत्ता पवार

आपल्याला जे काही मिळाले ते गावामुळे मिळाले त्याची परतफेड करावी .गावाच्या एकजुटीने गावचा सर्वांगिण विकास करावा या हेतूने दोन ऑक्टोबर २०२४रोजी स्थापन झालेल्या जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक सभागृहात संपन्न होत आहे. त्रिंबक गावविकासाचा ध्यास सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठीच आणि गावातील सर्वसेवार्थिंचा ७५वर्षे पुर्ण झालेल्याजेष्ठ नागरिकांचा सन्मान करुन त्यांचे आशिर्वाद घेऊन भविष्यातील कामांचा आरंभ करावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जागृत उन्नती मंडळ त्रिंबक मुंबई अध्यक्ष दत्ता पवार यांनी त्रिंबक येथे आयोजित बैठकीत दिली.यावेळी त्यांच्या सोबत त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, मुंबई समिती कार्याध्यक्ष चेतन साटम, सचिव अरविंद कदम, कोषाध्यक्ष संतोष त्रिंबककर, स्थानिक समितीचे अध्यक्ष यशवंत बागवे, सचिव उदय मेहंदळे, कोषाध्यक्ष श्रीमती पुजा सुतार यांसह
मार्गदर्शक सुरेंद्र सकपाळ,सुधाकर त्रिंबककर,दिनेश त्रिंबककर,अनिल कदम,श्रीमती दिपा केरकर,योगेश साटम, पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करताना पवार यांनी सांगितले की कार्यक्रमाची सुरवात गुरुवारी १५मे रोजी सकाळी ७.३०वाजता सत्यनारायण महापूजेने होणार आहे.सकाळी ९. ३०वाजता गाडगीळ गुरुजी वाचनालय येथून मंदार सकपाळ यांच्या ढोलपथकाच्या सहाय्याने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे .१०.३०वाजता अमृत सन्मान सोहळा होणार आहे.यात त्रिंबक गावातील जेष्ठ नागरिक,बाळंतपण काढणा-या सुईनीचा कृतज्ञता सन्मान,कोरोनात काम करणारे डॉक्टर ,गावठी वैदू आदी मिळून १५५जणांचा सन्मान केला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.दुपारी स्नेह भोजनानंतर सायंकाळी ५.३०वाजतास्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम तर संध्याकाळी ६.३०वाजता चंद्रकांत साटम मुंबई यांचा शिवदर्शन हा कार्यक्रम होणार आहे.तरी सर्वांनी गावच्या विकासासाठी आणि समृद्धी करीता एक दिलाने काम करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या कडून करण्यात आले आहे.