कणकवलीतून फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेला डंपर चोरीला

यापूर्वी देखील घडली होती एकदा घटना
डंपर चोरीला जाताना चे फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद
कणकवली शहरात प्रांत ऑफिस नजीक फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेला डंपर अज्ञाताने नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कणकवलीतील सुशील दळवी यांच्या मालकीचा Mh 07 1302 या क्रमांकाचा नंबर 10 मे रोजी रात्री 11:55 वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने नेल्याची घटना घडली. दरम्यान कणकवलीतील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये या डंपर जवळील त्या रात्री आलेली चार चाकी व त्यानंतर डंपर घेऊन गेलेली घटना कैद झाली आहे. मात्र याबाबत पुढील हालचाल दिसत नसल्याने या डंपरचा शोध घेणे कठीण बनले आहे. दरम्यान कणकवली पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली असून, कणकवली पोलीस या डंपर चा शोध घेत आहेत. यापूर्वी देखील कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली पार्किंग करून ठेवण्यात आलेला डंपर चोरीला गेला होता.