राम जन्म ला ग सखे रामजन्मला संस्थान आचरे गावात रामजन्मोत्सव नेत्रदीपक

ऐन मध्यान्ही च्या समयी रामदासी बुवांचे किर्तन रंगात आले होते.सर्वांची लगबग वाढली होती. आणि घटीका भरली. जय जय रघुवीर समर्थ ची आरोळी आसमंतात उसळली. गुलाल उधळला गेला. ढोलताशा सनईचा एकच स्वर निनादला राम जन्मला ग सखे राम जन्मला
गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या संस्थान आचरे गावच्या रामजन्मोत्सवातील हा अच्युतम क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी रामेश्वर मंदिर परीसर भाविकांनी भरुन गेला होता. रामजन्मोत्सवानंतर गुलाल उधळत,ढोल ताशा, बँड पथकाच्या वादनात बाळ रामाच्या गोजिरवाण्या मुर्तीची सरंजामासहीत रामेश्वर मंदिराला फेरी मारली गेली. यावेळी वाद्यांचे मंगलमय स्वर आणि रामजन्मोत्सवाचा महिमा गीतांचे मंगल स्वर संस्थानच्या प्रांगणात निनादत होते.
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या या संस्थानी थाटाच्या सोहळ्यास गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. रघुवीर आरती गवई गाणे, संध्याकाळचे मंगल स्नान माखन,,दरबारी गायन,रात्रौ पालखीत्सोव,किर्तन अशा दैनंदिन कार्यक्रमात हा सोहळा संपन्न होत असतो. आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी रामजन्मोत्सवानिमित्त विशेष बंदोबस्त ठेवला होता.
.
रामजन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद
या सोहळ्याला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी सतत गेली चाळीस वर्षे देवस्थान समिती,मानकरी, ग्रामस्थ रात्रभर झटून महाप्रसादाची व्यवस्था करत असतात. यावर्षीही देवस्थान समिती मानकरी ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे उत्तम नियोजन केले होते याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला होता.
रामनवमी उत्सवास मान्यवरांच्या भेटी
रामजन्मोत्सवास मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे तसेच कुणकेश्वर देवस्थान समितीने भेट देवून उत्सवाचा आनंद घेतला.त्यांचे देवस्थान समिती अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी, उपाध्यक्ष श्रीयांस कानविंदे देवस्थान समितीचे,संजय मिराशी ,ऍड शिल्पन गांवकर,मंगेश मेस्त्री यांनी यथोचित सन्मान केला.

error: Content is protected !!