कणकवली शहरातील भालचंद्र ज्वेलर्स दुकानामध्ये पहाटेच्या सुमारास चोरी

कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासहित पोलीस पथक घटनास्थळी दाखल

पोलिसांकडून चोरीचा कसून तपास सुरू

कणकवली शहरातील सना कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या भालचंद्र ज्वेलर्स मध्ये आज बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली. दुकानाचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासहित कणकवली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या ज्वेलर्स दुकानातील झालेल्या चोरी बाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज व त्या अनुषंगाने महत्त्वाचे धागेद्वारे मिळवण्याच्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. पहाटेच्या सुमारास त्या कॉम्प्लेक्समध्येच असणाऱ्या डॉ. केळकर यांना आवाज आल्याने त्यांनी तिथे पाहणी केली असता त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी सदर घटनेची तात्काळ मंगेश तळगावकर यांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच श्री तळगावकर हे आपल्या दुकानाजवळ दाखल झाले व त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान चोरीला किती मुद्देमाल गेला याची अद्याप माहिती स्पष्ट झाली नसली तरी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सदर बाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. सीसीटीव्ही असून देखील चोरट्यांकडून चोरी करण्याचे प्रकार सुरूच असल्याने आता पोलिसांसमोर हे एक तपासाचे आव्हान असणार आहे.

error: Content is protected !!