मारामारीच्या गुन्हयात आरोपी विरुद्ध कणकवली पोलीसांनी २४ तासाच्या आत दाखल केले दोषारोपपत्र

कणकवली तालुक्यातील प्रकाश काशीराम तेली (वय ५१ ) रा. शेर्पे राणेवाडी येथील हे त्यांच्या गोठयातील बैलांना गवत घालुन घरी जात असताना आरोपी अनंत केशव तेली (वय ६०) रा.शेर्पे राणेवाडी ता. कणकवली हा आपल्या घराच्या अंगणात हातात कोयती घेवुन बसलेला दिसला. म्हणून फिर्यादी हे त्यांच्या घरी दुसऱ्या वाटेने जात असताना वाटेत साक्षीदार रामचंद्र शेलार यांनी फिर्यादी यांना हाक मारली. म्हणून फिर्यादी हे साक्षीदार रामचंद्र शेलार यांचेशी त्यांचे घराबाहेर उभे राहुन बोलत असताना, यातील आरोपी हा फिर्यादी यांचे पाठीमागुन येवुन १५ दिवसापूर्वी फिर्यादी यांचे गोठ्यातील बेलाचे दावे कोणीतरी तोडले होते म्हणून फिर्यादी यांची पत्नी ही बडबडत होती, त्याचा राग मनात धरुन त्याने फिर्यादी यांचे अंगावर कोयती उगारुन ती कोयती फिर्यादी यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजुस लागुन किरकोळ दुखापत झाली आहे. म्हणून फिर्यादी प्रकाश काशीराम तेली यांनी दिले तक्रारीवरुन कणकवली पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. ८४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१) प्रमाणे ४ एप्रिल ९:०४ वाजता दाखल करण्यात आलेला आहे. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी सदर गुन्हयाची तात्काळ दखल घेवून सदर गुन्हयाचा तपास पूर्ण करुन आरोपी याच्या विरुद्ध सबळ पुरावा गोळा करुन गुन्हयाचे दोषारोपपत्र २४ तासाच्या आत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली न्यायालयात दाखल केलेले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली घनश्याम आढाव व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाण्याचे गुन्हयाचे तपासिक अंमलदार चंद्रकांत माने, रुपेश गुरव, सुप्रिया भागवत यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!