खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रा

कणकवलीतील “द पावर हाऊस जिम” चे आयोजन
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावतीने पुरविण्यात येणार सुविधा
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने द पॉवर हाऊस जिम कणकवली च्या संकल्पेतुन १० एप्रिल रोजी कणकवली भालचंद्र महाराज मठ ते कुणकेश्वर पर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून या पदयात्रेमध्ये सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच लिंगराज विटा या ठिकाणी देवगड भाजपाचे संदीप साटम यांच्या वतीने पदयात्रेत सहभागी होणाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क सुनिल निकम ९४२२०५६९५५, विक्रांत गाड ९८९०८१८१८७१, रोहन हडपत ८२०८६१५५९९
गौरव हर्णे ९४२३८०५९४१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.