इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे.या वर्षी सुप्रसिद्ध गायक समिर अभ्यंकर,विशारद गुरव यांच्या गायनाची रसिकांना पर्वणी राहणार आहे.
सकाळी मंदिरासमोर गुढीउभारण्यात आली.त्यानंतर वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदीचौकावर प्रतिष्ठापना केल्यावर या उत्सवाला सुरुवात झाली.मंदिरात संवस्तर पंचागवाचन केले गेले.मुर्ती प्रतिष्ठापनेनंतर दुपारी रामेश्वर मंदिराला रघुपती आरतीसह प्रदक्षिणा घातली गेली सायंकाळी माखण,दुपारी आणिसायंकाळी दरबारी गायन रात्रौ पालखी प्रदक्षिणा आणि त्यानंतर किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम ललितोत्सवापर्यंत चालतो.दुस-या दिवसांपासून सकाळी दहा आणि सायंकाळी सहा वाजता या उत्सवात दरबारी गायनाची परंपरा सुरु होते. सोमवार ३१मार्च रोजी सकाळी ११वाजता जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा यांचा स्वरयात्रा हा कार्यक्रम होणार आहे.तर सायंकाळी रवी पाटील सुरसंगम मालवण,संजय वराडकर आणि सहकारयांचा कार्यक्रम होणार आहे.मंगळवार १एप्रिल रोजी सकाळी ११वाजता आणि सायंकाळी सहा वाजता विनया परब रत्नागिरी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.बुधवार २एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सुधांशू सोमण मिठबांव यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.गुरुवार ३एप्रिल रोजी सकाळी ११वाजता दिलीप ठाकूर तर सायंकाळी सहा वाजता केशव गाडेकर पुणे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार चार एप्रिल रोजी सकाळी ११वाजता विनय वझे आणि सहकारी तर सायंकाळी सहा वाजता विशारद गुरव रत्नागिरी यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.शनिवार ५एप्रिल रोजी सकाळी ११वाजता विशारद गुरव तर सायंकाळी सहा वाजता समिर अभ्यंकर मुंबई यांचे गायन होणार आहे.रविवार ६एप्रिल रोजी राम जन्मोत्सव सोहळा किर्तन मिलिंद बुवा कुलकर्णी (रामदासी) यांचे होणार आहे.सायंकाळी समिर अभ्यंकर यांचे गायन होणार आहे .त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी प्रसाद शेवडे हे करणार आहेत.
सोमवार सात एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गायिका स्वरांगी गोगटे आचरा हिचे गायन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता संपदा दुखंडे आचरा यांचे गायन होणार आहे.
या वर्षी उत्सवात हभप गंगाधर व्यास बुवा डोंबिवली
यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ आनंद लिंगायत व तर तबला साथ अभिषेक भालेकर हे करणार आहेत.

error: Content is protected !!