उंडील येथील शिमगोत्सवात घरोघरी होतेय पालखी भेट

डफावरील थाप,ढोल ताशांचा गजर आणि पारंपारिक गीतांच्या लयीवर रंगणारे जत नृत्या सोबत पालखी नृत्य उंडील गावच्या शिमगोत्सवाचा उत्साह वाढवित आहे. चाकरमान्यांसह ग्रामस्थांच्या गर्दीत घरोघरी होणारी निशाण पालखी भेटीमुळे या गावचे वातावरण भक्तीमय बनले आहे.

उंडील ता.देवगड येथील नऊ दिवस चालणारया शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.होळीच्या दुसऱ्या दिवसापासून निनादेवी मंदिरातून निशाण पालखी गाव भेटीला निघाली आहे.घरोघरी पालखी भेटीत गा-हाणी ऐकत ग्रामस्थांचे नवस फेडणे नवस बोलणे कार्यक्रम केले जात आहेत.
यानिशाण पालखी घरभेटीला निनादेवी मंदिर येथून सुरुवात झाल्यानंतर चव्हाटा भराडीदेवी यांसह काळे लिंगायत यांच्या घरी भेट दिली.त्यानंतर
फाटकवाडी, तावडे वाडी, तानवडे हरियाणा वाडी, नर वाडी, ब्राम्हण वाडी, वाणेवाडी ,गावठणवाडी,यावाड्यांतील प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी पुढील आठ दिवसांमध्ये भेटी झाल्या नंतर नवव्या दिवशी शिंपण उत्सवानंतर या होळी उत्सवाचा समारोप होणार आहे.

error: Content is protected !!