कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या खळबळजनक व्हाट्सअप स्टेटस ने राजकीय घडामोडींचा “संदेश”

लवकरच ठाकरे गटातील बड्या पदाधिकाऱ्याच्या भाजप प्रवेशाचे संकेत

शेलक्या शब्दात समीर नलावडेंकडून इशारा

“राणे साहेबांना शिव्या देणारे, खालच्या पातळीवर टीका करणारे आता भाजपा प्रवेशा साठी निर्लज्जपणे लाचार होऊन लाचारी करत आहेत….. समझनेवालों को इशारा काफी है!”

हा व्हाट्सअप स्टेटस आहे कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा. आज सकाळपासूनच समीर नलावडे यांनी आपल्या व्हाट्सअप ला ठेवलेला हा स्टेटस भविष्यातील राजकीय घडामोडींचा “संदेश” देणारा ठरणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचा एक बडा पदाधिकारी भाजपमध्ये येण्याच्या चर्चेला आता या स्टेटस मुळे दुजोरा मिळू लागला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पडत असताना आता भाजपच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये असलेल्या माजी नगराध्यक्ष समीरला नलावडे यांनी लावलेला हा व्हाट्सअप स्टेटस हा चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत समीर नलावडे यांचे समजणे वालों को इशारा काफी है! हे शेवटचे वाक्य हे भविष्यातील राजकीय घडामोडींचा “संदेश” देणारे ठरत आहे. त्यामुळे आता याबाबत काय घडामोडी घडतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!