श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे आयोजित भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचा शुभारंभ संपन्न

शिडवणे गावात प्रथमच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन

बैलगाडा शर्यत बघण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी

कणकवली तालुक्यातील शिडवणे या गावी प्रथमच येथील श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने मंगळवार दी.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी भरविण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचा शानदार शुभारंभ वैभववाडी माजी सभापती श्री बाप्पी मांजरेकर श्री बंड्या मांजरेकर व यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व फित कापून करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.वित्त व बांधकाम सभापती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार,कणकवली माजी सभापती श्री दिलीप तळेकर,माजी सभापती प्रकाश पारकर,शिडवणे सरपंच श्री रवींद्र शेट्ये,उपसरपंच दीपक पाटणकर, शिडवणे गावचे सुपुत्र माजी सेवानिवृत्त सहा.पोलीस निरीक्षक मुंबई श्री विजय टक्के, वैभववाडी तालुका भाजप अध्यक्ष श्री सुधीर नकाशे,भाजप कार्यकर्ते सूर्यकांत भालेकर, कुरांगवणे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे,उपसपंच बबलू पवार, साळीस्ते उपसरपंच श्री गुरव,सदस्य श्री मयुरेश लिंगायत, संतोष टक्के,अमोल जमदाडे,तसेच बैलगाडा शर्यत स्पर्धेचे कोल्हापूर येथील समालोचक श्री रणजित पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गांगेश्र्वर मंदिर शिडवणेच्या भव्य माळ रानावरील पटांगणावर घेण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यत स्पर्धेवेळी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील स्पर्धक सुधा आपली बैल जोड घेऊन शर्यतीत सहभागी झाले होते.सुमारे ४० पेक्षा अधिक बैलगाडा स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन बैलगाडा शर्यतीत रंगत आणली होती.
तर या स्पर्धेची सुरवात जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीने करण्यात आली.यामध्ये गावठी बैलांचा समावेश होता.या स्पर्धेतील राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीतील प्रथम विजेता बैलगाडी स्पर्धकाला रोख रुपये १५०००/- रुपये व मानाची ढाल तर उपविजेता ११०००/- तृतीय क्रमांक ७७७७/- चतुर्थ क्रमांक – ५५५५/- व पाचव्या क्रमांकाला ३३३३/- रुपये व मानाची ढाल देऊन गौरवीन्यात येणार आहे.
तर जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता बैलगाडी जोडीला रोख १००००/- रुपये तर उपवीजेता जोडीला ७०००/- रुपये तृतीय क्रमांकाला – ५०००/- रुपये चतुर्थ क्रमांकला – ३०००/- रुपये व पाचव्या क्रमांकाला २०००/- रुपये व सर्वांना मानाची ढाल बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या निमित्ताने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तर आरोग्य पथक ,महसुल पथक,पशू वैद्यकीय पथक सतर्क ठेवण्यात आले होते. शिडवणे येथील हे स्पर्धेचे पहिलेच वर्ष असून जनतेचा स्पर्धेला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद लक्षात ही बैलगाडा शर्यत स्पर्धा पुढील वर्षी देखील मोठ्या भव्य प्रमाणात भरविण्यात येणार असल्याची माहीती यावेळी स्पर्धेचे आयोजक श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी सांगितली.या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचलन श्री संतोष टक्के यांनी केले तर समालोचन श्री जमदाडे सर व रणजित पाटील यांनी केले.या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेच्या
निमित्ताने संपूर्ण शिडवणे गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

error: Content is protected !!