कणकवली शहरात ठाकरे गटाला मोठे खिंडार

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश परकर यांना धक्का

प्रद्युम मुंज यांच्यासहित ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये

कणकवली शहरात शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून कणकवली शहरातील महापुरुष मित्र मंडळाचे व ठाकरे गटाचे क्रियाशील कार्यकर्त्यांनी आज मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाला कणकवली शहरात हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचेही निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना देखील राजकीय दृष्ट्या हा मोठा धक्का मानला जात आहे. आज नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपावासी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रद्युम मुंज,
वृषभ मेणकुदळे, रोशन मांगले, सुरज ओरसकर, रुद्र सापळे, हर्षल बिडये, जयेश मुंज,आशिष मुंज,तुषार मेणकुदळे,जयेश बिडये,निखिल लोकरे,मंदार पोटफोडे,विनायक तेली,सागर जावडेकर, जयेश जावडेकर,संदीप केतकर,भगीरथ प्रजापती,दिनेश सोलंकी, आकाश बिडये, अक्षय डिचोलकर, अमोल डिचोलकर, प्रथमेश सोलकर, आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,शहराध्यक्ष अण्णा कोदे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!