पालकमंत्री नितेश राणेंचा ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का!

कट्टर शिवसैनिक रामू विखाळेसह माजी जि प सदस्या स्वरूपा विखाळे भाजपात
कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर , युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सह शेकडो कार्यकर्ते भाजपात
पालकमंत्री नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला लागोपाठ धक्के देत असून ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी पत्नी माजी जि प सदस्य स्वरूपा विखाळे यांच्यासह कलमठ ग्रा पं सदस्य प्रियाली आचरेकर, युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, बूथ प्रमुख विनय हडकर , शाखाप्रमुख प्रणय आचरेकर यांच्यासह नंदकिशोर कोरगावकर, शंकर आचरेकर, महादेव हडकर, प्रथमेश मठकर, परेश आचरेकर, तुषार आचरेकर, इस्तियाज फकीर, सचिंद्र आचरेकर,जयंत आचरेकर, प्रशांत आचरेकर, गोविनथ हरमलकर, किसन आचरेकर, प्रणाली आचरेकर पांडुरंग आचरेकर अक्षय विखाळे ,निनाद विखाळे आदी प्रमुख शिवसैनिकांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.
दिगंबर वालावलकर कणकवली