शिवसेना ठाकरे गटातील “शेठजीं” सहित अनेकांचा आज भाजपामध्ये होणार पक्षप्रवेश

मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा आज ठाकरे गटाला मोठा दणका
मंत्री झाल्यानंतर नितेश राणेंकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षप्रवेशांचा धडाका
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असताना आज कणकवलीमध्ये मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटातील “शेठजी” नावाने ओळखले जाणाऱ्या ठाकरे गटातील कणकवली मतदार संघातील बड्या नावासह अनेक त्यांचे सक्रिय कार्यकर्ते हे देखील आज भाजपवासी होणार आहेत अशी खात्रीशीर सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. तसेच कणकवली शहरासह कणकवली तालुक्यातील अन्य विभागातील ही माजी सरपंच व अन्य प्रमुख पदाधिकारी आज भाजपमध्ये डेरे दाखल होणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाला आज कणकवली तालुक्यातून मोठे धक्के मिळणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हे राजकीय दृष्ट्या मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. ठाकरे गटाचे प्रमुख नेते माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा संपर्कप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे प्रमुख पदाधिकारी कणकवलीमध्ये कार्यरत असताना त्यांना मंत्री नितेश राणे यांच्या कडून हा मोठा धक्का दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्री झाल्यानंतर तालुक्यातील आजचा हा मोठा पहिला धक्का असणार आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली