श्री देव आदिनाथ मंदिराचा 33वा वर्धापनदिन सोहळा 17फेब्रुवारीला

बुवा-श्री.सुशांत जोईल -बुवा-श्री -योगेश पाडावे, यांच्या 20×20भजनाचा जंगी सामना चे आयोजन

कणकवली तालुक्यातील वायंगणी गावाचे ग्रामदैवत श्री आदिनाथ देवाचा 33वा वर्धापन दिन सोमवारी 17फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देव आदिनाथ आणि श्री गांगेश्वर मंदिर ट्रस्ट, वा्यंगणी यांच्या मार्फत करण्यात आला आहे.या वर्धापन दिन निम्मित 17फेब्रुवारी,सकाळी 6ते 7वा. श्री.गांगेश्वर मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी 7ते 8श्री आदिनाथ मंदिर येथे अभिषेक, सकाळी 8ते 9 श्री आदिनाथ मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी 9ते 10 श्री देव रवळनाथ, मोसम व श्री देव गांगेश्वर गुंजवणे पालखी आगमन, सकाळी 10ते 12 नवस बोलणे, नवस फेडणे, ओटी भरणे,
दुपारी 12ते 3 -महाप्रसाद, दुपारी 3ते 5 श्री ची पालखी मिरवणूक, श्री देव रवळनाथ, मोसम व श्री गांगेश्वर, गुंजवणे
रात्रौ 8ते 10वा. श्री देव आदिनाथ पालखी प्रदक्षिणा
रात्री ठीक 10वाजता 20×20 भजनाचा जंगी सामना बुवा -श्री. सुशांत दिलीप जोईल, श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,कातवण, गुरुवर्य बुवा श्री अभिषेक शिरसाट व तसेच बुवा -श्री -योगेश गजानन पाडावे, श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ,किंजवडे पाडावे वाडी, गुरुवर्य बुवा कै. श्री.गजानन पाडावे व बुवा श्री.विजय (गुंडू )सावंत. यांच्यात 20×20 भजनाचा जंगी सामना असणार आहे. तरी या वर्धापन दिन निम्मित आयोजित सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!