अवैध सिलिका व्यवसायावर झालेल्या दंडात्मक कारवाईची रक्कम वसूल झाली काय?

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा प्रशासनाला सवाल

अवैध व्यवसायाला पालकमंत्री, महसूल अधिकाऱ्यांचा वरदाहस्त आहे काय?

कासार्डे येथे सिलिका मायनिंग व्यवसाय सुरु असून या ठिकाणी दोन कंपन्यांना सिलिका वाळू वाहतुकीची परवानगी आहे. येथे सिलिका गौण खनिज चे दोन लीज पट्टे मंजूर आहेत, या दोन कंपन्या काही सिलिका व्यवसायिकांना वाजू चा पुरवठा करत आहेत. आताध्या चालू वर्षी या दोन्ही कंपन्यांना वाळू उत्खना साठी परवानगी आहे काय? असेल तर त्याचा कालावधी किती आहे. या व्यतिरिक्त दोन्ही कंपन्या शासनाची फसवणूक करून त्यांना परवानगी दिलेल्या लीज च्या व्यतिरिक्त (सिलिका) वाळू काढून ती पर जिल्ह्यात बेकायदेशीर रित्या विकत आहेत. कासार्डे नागसावंतवाडी हा इको सेंसिटिव्ह झीन असून या ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर रित्या (सीलिका) वाळू काढली जात आहे. या सर्व प्रश्नांची माहिती द्या असे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,
तसेच ज्या ठिकाणी परवानगी नाही अश्या कासार्डे क्षेत्रातील 7/12 व जमिनीवर सुद्धा (सिलिका) वाळू अवैध रित्या काढली जाते. याची सखोल चौकशी करण्यात यावी.
कृषी विभागाकडून शेत तळीची परवानगी घेऊन त्या ठिकाणी देखील अवैध रित्या (सिलिका) वाळू काढून विकली जात आहे. अश्या बेकायदेशीर (सिलिका) वाळू काढणाऱ्यान विरोधात खणीकर्म विभाग व महसूल विभाग यांच्याकडुन कठोर कारवाई का केली जात नाही. गेल्या 2019 ते 2024 वर्षा पर्यंत अवैध (सिलिका) वाळू काढणाऱ्या कोणावर दंडात्मक कारवाई झाली आहे याची माहिती मिळवी, या दंडात्मक कारवाई झाल्यावर वसुली साठी त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवला आहे काय याची ही माहिती मिळावी. 65/6 उत्तर दक्षिण गावठाण या सातबारा वरती दंडात्मक कारवाई झाली असून देखील या जमिनीवरती बेकायदेशीर (सिलिका) वाळू उत्खनन अजून काढले जात आहे. अश्या अवैध सिलिका वाळू काढणाऱ्यांवरती सत्ताधारी पालकमंत्री व महसूल अधिकारी यांचा वरदहस्त आहे काय असा प्रश्न उपस्थित होतो! या अवैध (सिलिका) वाळू काढणान्यांच्या जमिनीची छाननी करून लवकरात लवकर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड विलास गुडेकर अजित काणेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!