खारेपाटण येथे ७ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे आगमन

श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी शुक्रवार दी.७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्री देव केदारेश्वर रवळनाथ मंदिर खारेपाटण येथे होणार असून भाविकांनी स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यानिमित्त खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दी.७/२/२०२५ – सायं. ५ ते ६ मिरवणूक,सायं.७ ते ८ – महाआरती, रात्री – ८ ते १० महाप्रसाद,रात्री – १० ते ११ – संगीत भजन,तर शनिवार दी.८/२/२०२५ –
स.६ ते ७ – महाअभिषेक,स.८.०० नंतर स्वामींच्या पालखीचे राजापूर कडे प्रस्थान तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ खारेपाटणच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!