कवी संतोष खाडये (शोभासुत) यांचा नानिवडे ग्रामभूषण पुरस्काराने सन्मान

नानिवडे गावच्या सर्वांगीण विकासा साठी कार्यरत असलेल्या *नानिवडे ग्रामविकास मंडळ (रजि.) चा वर्धापनदिन सोहळा आणि स्नेहसंमेलन मुंबईत साजरे झाले. या वेळी विविध संस्कृतीक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी संपादक ,कवी संतोष खाडये यांना त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानासाठी नानिवडे ग्रामभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी नानिवडे क्रिकेट टीम, तसेच कराटे खेळात विशेष कामगिरी बजावणाऱ्या कु. सारा खाडये यांना देखील नानिवडे ग्रामभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास उद्योजक किशोर खाडये आणि रघुनाथ शिवगण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सीताराम खाडये यांनी केले तर अध्यक्ष विजय खाडये, उपाध्यक्ष सुनील खाडये यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली.

error: Content is protected !!