जिल्हाधिकारीअनिल पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत लोरे नं‌ १ कचरा संकलन ई-व्हॅन चा शुभारंभ

उद्यानाच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशंसा

ग्रामपंचायत लोरे नं१ माध्यमातून व लोक सहभागातून ग्रामीण भागामध्ये जिल्हा पर्यटनाला साथ घालणार असं आगळंवेगळं श्री रुजेश्वर देवस्थान उद्यान साकार झाले आहे दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी उद्यानाचा उद्घाटन सोहळ्यास अनिल पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी भेट दिली तसेच संपूर्ण उद्यानाची पाहणी करून या नावीन्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली तसेच मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ग्रामपंचायत ई कचरा व्हॅन शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त करताना मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी गावात मुलींचा जन्म झाल्यास तिच्या नावे तसेच गावातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास तिच्या नावे वृक्षारोपण करणे व त्या रोपांचा सांभाळ संबंधित कुटुंबाने करणे परिणामी स्मृती वन निर्माण व्हावे असे अपेक्षा व्यक्त केल्या याप्रसंगी श्री.तुळशीदास रावराणे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग , श्री.मनोज रावराणे माजी सभापती – पं.स.कणकवली,दिलीप तळेकर – तालुकाध्यक्ष कणकवली,भाजपा,सुरेश सावंत,श्री.अजय रावराणे – सरपंच ग्रामपंचायत लोरे नं.1,श्री.सुमन गुरव – उपसरपंच ग्रामपंचायत लोरे, श्री.राकेश गोवळकर, ग्रामपंचायत अधिकारी,दामोदर नारकर,नरेश गुरव,सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!