आचरा विभागात पोलीस मित्र नेमण्याची.शिवसेना आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील आचरा विभागात घरफोडी आणि अनधिकृत धंद्याचं स्तोम माजले असून या विभागातील नागरिक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. हा विभागा मुख्यत्वे ग्रामीण असल्याने गुन्ह्याच्या तपासाला देखील समस्या येत असतात.तसेच सीमा देखील असतात. त्यामुळे अशा गुन्ह्याना पायबंद घालण्यासाठी तसेच अवैध धंदे आणि इतर गुन्हेगाराली आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने पोलीस मित्र ही संकल्पना आचरा विभागात राबवावी, अशी मागणी शिवसेना आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. आचरा विभागातील तोंडवळी ,वायंगणी, आचरा, कोईळ ,बांदिवडे, चिंदर, त्रिंबक, पळसंब या गावात पोलिसांना गुप्त पणे सहकार्य करणारा पोलीस मित्र पोलीस प्रशासनाने नेमावा, अशी मागणी गोलतकर यांनी केली आहे.
गुप्त पोलीस हे राजकीय आणि सामाजिक नियंत्रण राखण्यासाठी राष्ट्रीय सरकारांनी स्थापन केलेले पोलीस असतात.
पोलीस मित्र समिती ही एक स्वयंसेवी योजना आहे. या योजनेतून कोणताही भारतीय नागरिक पोलीस वेब पोर्टलवर जाऊन फॉर्म भरून स्वयंसेवा करू शकतो. या योजनेत गुन्हेगारी रोखणे, पर्यावरण संवर्धन, सोशल मीडिया विषयांमध्ये मदत करणे, जागरूकता वाढवणे असे काम केले जात असल्याचे गोलतकर यांनी सांगितले.