नाम. नितेश राणे यांचे कनेडी प्रभागात जंगी स्वागत

भिरवंडे मुख्य रस्ता नुतनीकरण आणि भिरवंडे हनुमंतवाडी ब्रिज कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते भुमीपूजन
विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतदान करा भिरवंडे वासियांना गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द ना.नितेश राणे यांनी दिला होता त्या प्रमाणे राज्य शासनाच्या बजेट योजने मधून मंजूर करण्यात आलेल्या भिरवंडे हनुमंत वाडी येथे ब्रिज बांधणे रक्कम दोन कोटी पंचवीस लाख रुपये व सांगवे गणेश मंदिर ते भिरवंडे रामेश्वर मंदिर पर्यंत मुख्य रस्ता रक्कम पन्नास लाख या विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांचा हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आला. यापुढेही गावच्या विकासकामांसाठी भरगोस असा निधीउपलब्ध करून देण्यात येईल असे मंत्री महोदयांनी जाहीर केले.
यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत, सौ संजना सावंत, शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, उपतालुका प्रमुख सुनील सावंत जेष्ठ ग्रामस्थ गणपत सावंत गुरुजी माजी सरपंच आबा सावंत शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत बूथ प्रमुख संतोष सावंत आशिष सावंत, संदीप सावंत व भिरवंडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर रामेश्वर मंदिर येथे देवालय संचालक मंडळ व भिरवंडे ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला विकास कामांसाठी निधी दिल्या बद्धल भिरवंडे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
पालकमंत्री मंत्री पदी निवड झाल्या नंतर पहिल्यांदाच कनेडी प्रभागात आलेल्या नामदार श्री नितेश राणे साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिशबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.