विद्वत्ता जातीने येत नाही तर ती गुणांनी येतेखासदार अरविंद सावंत यांचे प्रतिपादन

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, गुरुकुल या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा संस्था अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक श्री. जी.ए.सावंत सर, संस्था सचिव श्री. शशिकांत सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी संस्था विश्वस्त व शालेय समिती चेअरमन ॲड. श्री राजेंद्र रावराणे साहेब,संस्था विश्वस्त श्रीम.योगिनी गुरव मॅडम, शालेय समिती उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण सावंत,शालेय समिती सदस्य श्री. मोहनराव सावंत, सौ.सायली पांचाळ मॅडम, श्री.अरविंद सुतार, कुंभवडे गावच्या प्रथम नागरिक सौ. विजया कानडे मॅडम,गुरुकुल समिती सचिव श्री.मधुकर सावंत,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा सावंत सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समितीचे चेअरमन एडवोकेट राजेंद्र रावराणे साहेब यांनी केले यावर्षी सलग २२ व्या वर्षी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रशालेची मागील एक वर्षाची वाटचाल सांगत असताना विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवल्याबद्दल अभिनंदन केले तसेच मार्गदर्शक शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी विभाग स्तरापर्यंत मजल मारल्याबद्दल विशेष कौतुक केले.तसेच विविध दात्यांच्या माध्यमातून प्रशालेस तसेच गुरुकुल मध्ये आर्थिक मदत केलेल्या दात्यांचे आभार यावेळी रावराणे साहेब यांनी मानले.तसेच रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत दिला जाणारा २०२४-२५ यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक श्री संदीप सावंत सर यांना मिळाल्याने प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे असे मत रावराणे साहेबांनी मांडले.
यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उज्वल यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले तसेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची आदर्श विद्यार्थ्यांनी म्हणून कु.भावना सावंत तर आदर्श विद्यार्थी म्हणून कु.संचित बांदविडेकर तसेच अष्टपैलू विद्यार्थी म्हणून कु.भविष्य भोगटे यांची निवड करून त्यांना चषक प्रमाणपत्र व (ॲड.राजेंद्र रावराणे पुरस्कृत)रोख रक्कम १००० रुपये देऊन गौरविण्यात आले. शंकर महादेव सावंत ग्राम विकास संस्थेमार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशालेचे हरहुन्नरी, उपक्रमशील शिक्षक श्री. संदीप सावंत सर यांना देऊन गौरविण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचा संग्रह म्हणजेच यावर्षीचे चित्रलिखित “कलादर्पण” याचे प्रकाशन सन्मा. खासदार अरविंद सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना जी. ए.सावंत सर यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढील वाटचाल करणे गरजेचे आहे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषण करत असताना सन्माननीय खासदार श्री अरविंद सावंत साहेब यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक भूकेप्रमाणे वैचारिक भूक लागली पाहिजेत आणि त्यातूनच अभ्यासाची गोडी वाढवून अधिकाधिक यश संपादन केले पाहिजे असे सांगितले. साहेबांनी यावेळी साने गुरुजींचे उदाहरण देताना पायाला माती लागली म्हणून जशी काळजी करता तसेच मनाला माती लावू देऊ नका कोणत्याही प्रकारचा डाग स्वतःला लावून देऊ नका अशा प्रकारचे आपले व्यक्तिमत्व घडवा असे सांगितले तसेच माझ्या शाळेचा विद्यार्थी आय.ए.एस.,आय.पी.एस. झाला पाहिजे त्याकरिता जी लागेल ती मदत पुरवण्याचे वचन यावेळी साहेबांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच प्रशालेमध्ये सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम चालू करणार असल्याचे देखील यावेळी सन्माननीय संस्था अध्यक्ष खासदार अरविंद सावंत साहेब यांनी सांगितले.
आभार प्रदर्शन व्यक्त करताना संस्था सचिव श्री शशिकांत सावंतजी यांनी
घार हिंडते आकाशी परि चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे खासदार साहेब आपल्या प्रशालेकडे बारीक लक्ष देऊन आहेत आणि आपल्या शाळेची उत्तरोत्तर अधिक प्रगत प्रगती कशी होईल याकरिता कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व संस्था पदाधिकारी,सर्व शालेय समिती पदाधिकारी, सर्व गुरुकुल समिती पदाधिकारी, सर्व पालक यांचे आभार मानले या व्यासपीठीय कार्यक्रमानंतर मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले.