कणकवलीत भर दिवसा दुकान गळ्यात घुसून फिल्मी स्टाईलने तोडफोड

जुना भाडेकरू व मूळ मालक यांच्यातील वाद उफाळला
भर दिवसा घडलेल्या प्रकाराने पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
कणकवली शहरात पटवर्धन चौकात सायंकाळच्या सुमारास एक जुना भाडेकरू व मुळ मालक यांच्यातील जुन्या वादातून तिथे असलेल्या दुकान गाळ्या मध्ये तोडफोड करण्याचा प्रकार घडला. यात जुना भाडेकरू असलेल्या सह त्यांच्या एका सहकाऱ्याने दुसऱ्याला भाड्याने दिलेल्या दुकान गळ्याततील साहित्याची तोडफोड केल्याची फिल्मी स्टाईल घटना घडली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून, कणकवली शहरातील भरदिवसाच्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.जुना भाडेकरू व मालक यांच्यात हायवे चौपदरीकरणात बाधित इमारतीवरून वाद होता. यावरून यापूर्वी देखील एकदा या दोघांमध्ये वाद झाला होता. हे दुकान गाळे अन्य एका व्यवसायिकाला मूळ मालकाने भाड्याने दिलेले असताना त्याचे काम सुरू होते. या दरम्यान जुना भाडेकरू व त्याचा सहकारी येथे येत त्यांनी तोडफोडही केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी कणकवली पोलीस काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.