कुडाळ, आचरा मार्गे देवगड जाणारी एस. टी बस फेरी नियमित न आल्यास आंदोलन

कुडाळ आगार व्यवस्थापकांना माजी सभापती अशोक बागवे, भाजप नेते प्रकाश मेस्त्री, पळसंब सरपंच महेश वरक यांच्या वतीने निवेदन

आचरा–अर्जुन बापर्डेकर

    कुडाळ आगारातून संध्याकाळी 5 वाजता सुटणारी कुडाळ, कणकवली, त्रिंबक, चिंदर, आचरा मार्गे देवगडला जाणारी व सकाळी त्याच मार्गाने परत येणारी एस. टी बस फेरी गेलें अनेक दिवस अनियमित आहे. या गाडीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांचे

विद्यार्थ्यांचे हाल होतं आहेत. यामुळे याबाबत चिंदर त्रिंबक, पळसंब लोकप्रतिनिधींनी याबाबत कुडाळ आगार व्यवस्थापक रोहीत नाईकयांचीभेट घेत गाडी नियमित न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती अशोक बागवे, भाजप नेते प्रकाश मेस्त्री, पळसंब सरपंच महेश वरक आदी उपस्थित होते.या
निवेदनात कुडाळ, कणकवली, त्रिंबक, चिंदर, आचरा मार्गाने देवगडला जाणारी एस. टी बस फेरी नियमित झाली नाही तर कोणतीही पूर्व कल्पना न देता प्रवाशानकडून रास्ता रोको करण्यात येईल आणि याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल. याबाबत नाईक यांनी
एस. टी बस नियमित करण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिल्याचे संबंधित लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!