देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे निधन.

कणकवली/मयूर ठाकूर.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच नुकतच निधन झालं.श्वसनाचा त्रास चालू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.२६ सप्टेंबर १९३२ रोजी स्वातंत्र्य काळापूर्वी त्यांचा जन्म झाला होता.२२ मे २००४ पासून २६ मे २०१४ पर्यन्त देशाचे ते 14 वे पंतप्रधान होते.ते काँग्रेस पक्षाचे सदस्य तसेच जेष्ठ नेते होते. डॉ मनमोहन सिंह हे राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत.देशाची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारणामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.आर्थिक सुधारणा आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली होती.