शिडवणे ग्रामपंचायत च्या वतीने मंत्री नितेश राणेंचे स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मंत्री राणे यांचे केले जंगी स्वागत
राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 22डिसेंबर रोजी दाखल झाले. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे भव्य असे जंगी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले.शिडवणे ग्रामपंचायत च्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंत्री राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्यात येणार असल्याने त्याच्या स्वागताची दमदार तयारी करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे मंत्री राणे यांच्यावर 51जेसीबी, दोन क्रेन मधून पुष्पवर्षाव करण्यात आला. ढोल ताश्याच्या गजरात राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.माजी जि. प. सदस्य बाळा जठार,शिडवणे सरपंच- रवींद्र शेट्ये, उपसरपंच -दीपक पाटणकर, बूथ अध्यक्ष महेंद्र टक्के, प्रभाकर सुतार, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.