श्री महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळ नडगिवे यांच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमानिमित्त स्मरणिकेचे व दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

श्री महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त स्मरणिका आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नडगिवे गावामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात समाजकार्य व्हावे या हेतूने 1974 साली या मंडळाची स्थापना लालबाग येथील एका छोट्याशा जागेत करण्यात आली. गेली पन्नास वर्षे या मंडळाच्या माध्यमातून समाजामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या माध्यमातून होत आहे. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ गुळेकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत आंबेरकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या पंचक्रोशीतील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, सर्व संचालक, शेठ न.म. विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय सानप व पर्यवेक्षक श्री संतोष राऊत यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

error: Content is protected !!