सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा ‘आपले बाबा’ साहित्य पुरस्कार उर्मिला पवार यांच्या हस्ते.

कणकवली/मयुर ठाकूर
सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ आपले बाबा’ हा साहित्य पुरस्कार 20 मार्च रोजी महाड चवदार तळे पाणी सत्याग्रह दिनी प्रसिद्ध साहित्यिका आयदानकार उर्मिला पवार यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.
हा पुरस्कार डॉ श्रीकांत धारपवार यांच्या ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीबाबतच्या पुस्तकाला व डॉ मिलिंद शेजवळ- हिरामण शेजवळ यांच्या ‘आंबेडकरी जलसा’ या नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीबद्दल पुस्तकाला प्राप्त झाला आहे. डॉ धारपवार आणि डॉ शेजवळ हे दोघे मुंबई केइम हॉस्पिटलचे 1974 सालाचे विद्यार्थी आहेत.
पुरस्कार रोख रक्कम व मानपत्र ऑनलाइन कार्यक्रमात प्रदान केले जाईल. यावेळी सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आणि सिंधवैभव साहित्य समूह, सिंधुदुर्गचे शुभांगी पवार, स्नेहा राणे-सरंगले तसेच डॉ सतीश पवार सहभागी होतील.