साकेडी माजी सरपंच शामसुंदर राणे यांचे निधन
कणकवली तालुक्यातील बोरीची वाडी येथील रहिवासी व गावचे माजी सरपंच शामसुंदर बाळकृष्ण राणे (वय 80) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. साकेडी सरपंच म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत काम केलेले होते. साकेडी देवस्थानचे मानकरी म्हणून देखील त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले होते. जुन्या चालीरीतींचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. काल मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कणकवलीतील सुहास पान स्टॉलचे सुहास परब यांचे ते सासरे होत.