वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १२वा वर्धापन दिन सोहळा ११डिसेंबर पासून१३डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा बारावा वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबर पासून सुरू होत आहे. १३ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात बुधवारी ११डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ मठातून वायंगणी गावात पालखी प्रस्थान व वायंगणी गावात पालखी परिक्रमा दुपारी बारा वाजता रवळनाथ मंदिर येथे महाप्रसाद सायंकाळी सहा वाजता पालखीचे स्वामी मठात आगमन सात वाजता नित्य आरती. गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता राजोपच्यारपूजा अभिषेक व सहस्त्र बिलवार्पण . सकाळी नऊ वाजता ११श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी आरती व महाप्रसाद सायंकाळी चार वाजता स्थानिकांची सुस्वर भजन होणार आहेत .शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी महाप्रसाद सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, रात्री दहा वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी आयोजित देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवन यांचा क्षेत्रपाल श्री देव क्षेत्रपाल श्री देव वेतोबा हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी चे अध्यक्ष सदानंद राणे व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.