कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार- वैभव नाईक
माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी
माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कुडाळ तालुक्यातील माणगाव, घावनळे, बांबर्डे या जिल्हा परिषद मतदारसंघात दौरा करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. विधानसभा निवडणुकीत पाठीशी राहिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे व जनतेचे त्यांनी आभार व्यक्त करत कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हा संघटक श्रेया परब,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक,माजी जि. प. सदस्य राजू कविटकर हे प्रमुख पदाधिकारी
तसेच माणगाव येथे विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, विभाग संघटक कौशल जोशी, रमा ताम्हाणेकर, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, एकनाथ धुरी,आकेरी सरपंच महेश जामदार,उमेश परब,संतोष परब,अशपाक कुडाळकर, शेखर देऊलकर,मंगेश परब,अशोक बांबर्डेकर,अक्षय मांजरेकर,शिर्के, गणेश बोभाटे,सचिन भिसे आदी
घावनळे येथे विभाग प्रमुख रामभाऊ धुरी, सुधीर राऊळ, पप्पू म्हाडेश्वर, वसोली सरपंच अजित परब, निलेश सावंत,तुषार परब,बाबी निकम,रुपेश निकम,दादा ताम्हाणेकर,महेंद्र राऊळ,दिपक सावंत,महादेव रेगडे,आप्पा गोडके,रशीद परब,भाई घाडी आदी
बांबर्डे येथे विभाग प्रमुख नरेंद्र राणे,विभाग संघटक संदीप सावंत,उपविभागप्रमुख प्रदीप गावडे,उपविभागप्रमुख मंगेश मर्गज,योगिता पवार,वेताळ बांबर्डे सरपंच दळवी, युवासेना विभागप्रमुख कदम,जगदीश सरनोबत,महेंद्र पिंगुळकर, संतोष पिंगुळकर,मुकुंद सरनोबत,महेश गुरव, संतोष सावंत,भरत घाडी,धनंजय बिरमुळे,दिवाकर बागवे,अमोल सावंत,नितीन सावंत,विद्याधर मुंज,मुकेश पालव,बाबू मर्गज यासंह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.