बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा सिंधुदुर्ग शिवसेनेने केला निषेध
वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर,सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे केले आंदोलन
बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधाचे फलक झळकावत बांग्लादेश सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि, बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. हि बाब अत्यंत दुःखदायक असून सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,संघटक बबन बोभाटे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपनेत्या जान्हवी सावंत,गणेश गावकर, नागेश ओरोसकर,गंगाराम सडवेलकर, सचिन सावंत,बंडू ठाकूर, बाबी जोगी, छोटू पारकर,अवधूत मालणकर, सचिन काळप,सागर भोगटे,अमित भोगले, संतोष परब, धीरज मेस्त्री, योगेश तावडे,सुशील निब्रे, रवी कदम, सचिन ठाकूर,सुनील कदम, सिद्धेश मांजरेकर यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.