आमदार नितेश राणे यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

आमदार नितेश राणेंनी घेतली बावनकुळे यांची मुंबईमध्ये भेट
भाजपचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांचे खास कौतुक करत अभिनंदन देखील केले. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य उपस्थित होते.