खारेपाटण मधील अनेक ग्रामस्थ शिवसेना ठाकरे गटात

स्थानिक आमदार नितेश राणेंच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक
महाविकास आघाडी उमेदवार संदेश पारकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचां निर्धार
खारेपाटण बंदरवाडी येथील नागरिकांनी महाविकास आघाडीचे कणकवली मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. गेल्या दहा वर्षात आमदार नितेश राणे यांनी बंदर वाडीचा कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. फक्त निवडणुकी पुरत्या भूलथापा मारल्या. कोणत्याही प्रकारचा विकास आमच्या खारेपाटण गावाचा झाला नाही. त्यामुळे स्थानिक आमदाराला कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही असा संकल्प करून इथल्या ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा संदेश पारकर या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करण्याचा निर्णय यावेळी येथील ग्रामस्थांनी घेतला. यावेळी प्रवेश करणाऱ्यांमध्ये असरफ मुकादम, तेजस मुकादम,तेसिम मुकादम, यास्मिन मुकादम, फर्जना मुकादम, अब्दुल्ला मुकादम, अंजू ठाकूर, इरफान ठाकूर अनेक नागरिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला .
कणकवली प्रतिनिधी





