संस्थान आचरा गावच्या कार्तिकोत्सवाची सांगता


आचरा–अर्जुन बापर्डेकर,
संस्थान आचरे गावच्या गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवातील पालखी सोहळ्याची सांगता शुक्रवारी रात्रौ दिपोत्सवाने तर पहाटे सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता शनिवारी पहाटे दहिहंडी फोडून करण्यात आली. त्रिपुरारी पोर्णिमेची सायंकाळ संगीत अलंकार प्रा केशवराव गाडेकर पुणे यांच्या गायनाने अविस्मरणीय ठरली होती.


संस्थान आचरेगावचा सर्वात मोठा म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो.कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर हा उत्सव चालू असतो.यात रात्रौ पालखी सोहळा असतो तर पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती रंगते.कार्तिक दशमीला आचरा वरचीवाडी येथील नारायण मंदिराला तर कार्तिक एकादशीला देवूळवाडी येथील विठ्ठल मंदिराला श्री विष्णू विराजीत पालखीभेट दिली होती.यावेळी भाविकांची गर्दी उसळली होती.
त्रिपुरारी पौर्णिमेला पावसाचे सावट असतानाही भाविकांचा उत्साह कमी झाला नव्हता . रात्रौ
रामेश्वर मंदिर आणि दिपमाळा आकर्षक फुलांनी सजविण्यात येवून दिपोत्सव करण्यात आला होता. काही ठराविक वेळीच होणारे पंचमुखी महादेवाचे दर्शन त्रिपुरारी पूर्णिमेदिवशी होत असल्याने दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. पहाटे विठ्ठल मंदिरातील काकड आरतीला प्रदक्षिणेनंतर पावल्यांचा फेर धरून दहिहंडी फोडून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.पहाटे भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.

error: Content is protected !!