कलमठ ग्रामपंचायत सदस्य हेलन कांबळे यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत

नुकताच केला होता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
कलमठ ग्रामपंचायत च्या सदस्य हेलन कांबळे व भाजप चे माजी विभाग प्रमुख जितेंद्र उर्फ जितू कांबळे यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवलीच्या जाहीर सभेत पक्ष प्रवेश केला होता. त्यांचे आज आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत विजय भवन येथे स्वागत केले. त्यांच्यासोबत विलास गुडेकर, महेश कोदे, अनुप वारंग आदी उपस्थित होते.





