महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला आचरा पिरावाडी,देवूळवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

निलेश राणे यांना या भागातून आघाडी मिळवून देण्याचा निर्धार

आचरा पिरावाडी,देवूळवाडी येथे शुक्रवारी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पिरावाडी येथे श्री देव चव्हाटा चरणी श्रीफळ ठेवून घरोघरी प्रचाराला ग्रामपंचायत सदस्य चावलं मुजावर व डॉ प्रमोद कोळंबकर यांच्या समवेत सुरुवात झाली. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नीलेश राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत यासाठी पुन्हा एकदा श्रीदेव चव्हाटा यांना साकडे घालण्यात आले. घरोघरी प्रचार करताना स्थानिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी या भागातून राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन प्रचारातील उपस्थितांनी केले. यावेळी उपस्थित मतदारांनीही नीलेश राणे यांच्या पाठिशीच ठाम असल्याचे सांगितले. या प्रचारा दरम्यान शिवसेना उबाठा गटाचे अब्दुल मुजावर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस,माजी सरपंच डॉ. प्रमोद कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर उर्फ चावल मुजावर, बड्या पराडकर, भगवान कोळंबकर,रत्नाकर सारंग, सुधीर पराडकर, राजा मुळेकर, आनंद तारी, दर्शन तारी,नितीन तारी, सतीश खवणेकर, महादेव जोशी, अजय कोयंडे, आप्पा कुबल, सोनू कोळंबकर,मुरलीधर कोळंबकर, मोहन परब, मिनेश धुरी, जितेंद्र धुरी, किशोर तळवडकर, सौरभ राऊळ, नीलिनी तोडणकर, मंदा टिकम, मुक्ता तारी, अक्षया सांरग, संगीता कुबल, विशाखा राऊळ, धनश्री पराडकर, नेत्रा तारी, धनश्री होडेकर, अपर्णा जोशी, सुषमा कोळंबकर, श्रावणी तोडणकर, चिन्मयी खोबरेकर, खुशाल हुर्णकर, निखिल आचरेकर, सखाराम मुळेकर, मेघश्याम कुबल, अक्षय जोशी,ओंकार कोळंबकर, सूर्यकांत धुरी, मनीषा कुबल,अजित घाडी, अंजु बापर्डेकर नारायण जोशी अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
देवूळवाडी येथेही प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आचरे गावातून प्रचाराला मिळणारा प्रतिसाद बघता महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना या भागातून आघाडी मिळणार असल्याचा विश्वास शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, सरपंच जेरान फर्नांडिस यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!