उद्धव ठाकरे यांची सभा होताच कणकवली मतदारसंघात ठाकरेंना मोठा दणका

उंबर्डे – कोळपे येथील शेकडो मुस्लिम बांधवांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

उद्धव ठाकरे विकासाचे बोलत नाहीत केवळ शिव्या आणि टोमणे मारतात हा एक कलमी कार्यक्रम – रज्जब रमदुल

कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होताच दुसऱ्या दिवशी या तालुक्यातील उंबर्डे व इतर भागातील मुस्लिम नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुस्लिम समाजानेच उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवल्याने उंबर्डे – कोळपे येथील रज्जब रमदुल उ.बा.ठा सेना उपजिल्हाप्रमुख, उमर रमदुल चेअरमन चाऀद नवभारत सोसायटी, समीर लांजेकर संचालक नवभारत सोसायटी यांनी हा प्रवेश केला आहे
उद्धव ठाकरे यांनी वैभववाडी मध्ये येऊन केवळ दुसऱ्याला टोमणे मारणे या पलीकडे काहीही केलेले नाही विकासाचा कोणताही मुद्दा मांडला नाही. यामुळे जर विकास व पायाभूत सुविधावे असतील तर आमदार नितेश राणे हाच पर्याय आहे असे प्रवेशकर्त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासोबत
सय्यद नाचरे,महमद हनीफ रमदुल, रमजान रमदुल, दस्तगीर रमदुल, महमद रमइल,नतु रमदुल, हुसेन मनाजी,मन्शीर रमदुल, हुसेन नाचरे,खलील रमदुल, अल्लाउद्दीन पाटणकर, महमद थोडगे, समीर नाचरे,आमीर जेठी,आसिफ रमदुल,बिलाल रमदुल,कादीर नाचरे, युसुफ नंदकर,हसन नंदकर,काशिम नंदकर, अब्दुल नाचरे यांनी प्रवेश केला आहे.

error: Content is protected !!