शिवसेना प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
घोषणांनी परिसर दुमदुमून गेला
आचरा–अर्जुन बापर्डेकर
निलेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है येऊन येऊन येणार कोण निलेश राणेंशिवाय आहे कोण अशा घोषणा देत आचरा बाजारपेठेत शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.गुरुवारी सकाळी आचरा बाजारपेठेतून निलेश राणे यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरी काढण्यात आली. आचरा मच्छीमार्केट कडून या फेरीला सुरुवात करण्यात आली .आचरा तिठ्या पर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे,बाळा चिंदरकर, तालुकाध्यक्ष महेश राणे, संतोष कोदे,जेरान फर्नांडिस,राजन गांवकर, मंगेश गावकर,अवधूत हळदणकर, डॉ प्रमोद कोळंबकर, संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, मुझफ्फर मुजावर,अभय भोसले,सचिन हडकर,पंकज आचरेकर,महेंद्र घाडी,चंदू कदम,उदय घाडी,गुरुप्रसाद कांबळी,रुपेश हडकर,किशोर आचरेकर,शाम साटम यांसह आचरा परीसरातीरबहुसंख्य शिवसैनिक,भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.