विजयराव नाईक कॉलेज फार्मसी च्या विद्यार्थ्यांचा पशुपालन व कृषी स्तरात प्रथम क्रमांक

संस्थाअध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्ष स्नेहा नाईक यांच्यासह संचालक मंडळाने केले अभिनंदन

कणकवली विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथील तृतीय वर्ष बी फार्मसीचे विद्यार्थी जयदीप अविनाश पवार यांनी २०२४-२५ च्या अविष्कार स्पर्धेत (कोल्हापूर-सातारा विभागीय पातळी) कृषि व पशुपालन श्रेणी, पदवी स्तरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जयदीप पवार यांनी पशुपालन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी गायांच्या दूध उताराच्या फटीसाठी विशेषतः वेटर्नरी वापरासाठी एक क्रीम तयार केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना प्रमाणपत्र आणि पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शिका प्रा. स्वप्नाली पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, तर स्पर्धेचे समन्वयक प्रा. प्रणाली पांगम व प्रा. निखिल गजरे यांनी महत्त्वपूर्ण सहाय्य आणि समर्थन दिले. तसेच या यशस्वी प्रवासात प्राचार्य डॉ. राजेश जगताप, अधिष्ठाता श्री. चंद्रशेखर बाबर आणि विभागप्रमुख श्री अमर कुलकर्णी यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले.
जयदीप पवार यांच्या या यशामुळे कॉलेजचे नाव उज्जवल झाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. मंदार सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!