करंजे गावात आम.नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

आमदार राणेंच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे नितेश राणेंना गावातून एक गठ्ठा मतदान करण्याचा केला निर्धार
विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. प्रत्येक गावात आपापल्या परीने महायुतीच्या कार्यकर्त्याकडून प्रचाराचा सपाटा लावला आहे. यातच
महायुतीचे उमेदवार आमदार नितेश नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करंजे गावात श्री देव लिंग रवळनाथ मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी श्री नितेश नारायण राणे यांच्या आमदार निधीतून झालेल्या विकास कामामुळे गावातून एक गठ्ठा मतदान आम.राणे यांना देणार असल्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.
यावेळी करंजे सरपंच सौ सपना मेस्त्री, माजी सरपंच श्री मंगेश तळगावकर,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर,ग्रा. प सदस्य रेणुका सातवसे,गजानन करंजेकर,बूथ अध्यक्ष विठ्ठल नारकर,तुकाराम परब,कांता चिंदरकर,लाडू परब, बाळा करंजेकर,समीर करंजेकर,विश्राम बागवे,योगेश करंजेकर,आपा सातवसे,मंगेश राणे,जयवंत भाकरीये,श्री मोदी,बबन घोने,राजेश परब, आण्णा सातवसे,संतोष घोणे,श्री बोभाटे,राजन चिंदरकर,चंद्रकांत चिंदरकर,संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.